Wednesday, January 14, 2009

'मी'

मी असा एक दिवाना जो आपल्याच जगात वावरतो. जो जगतो अश्या जगात जिथे माणुस माणसाला विचारत नाही. सगळी माणसे स्वतःच्या अश्या भावविश्वात जगतात. तसाच मीही जगतो, अगदी तसाच...........

असो माझ्या बद्दल सांगायचे असे विशेष असे काही नाही , मी स्वभावतः फारच शांत आहे जास्त कोणाशी बोलत नाही पण मित्र लवकर बनवतो.
जे मनात वादळ आहे ते वरून कुणालाही दिसत नाही. कुणी मला चांगला म्हणते कुणी वेडा,
अरे पण खरे सांगायचे आहे मि वेडा तिच्या प्रत्येक अदांचा!!!!
कधी ति प्रेम दाखवते, कधी द्वेश,
कधी कधी मायेने गोंजारते तर कधी चुकले तर ओरडतेही. अरे घाबरू नका मि कुणा मुलीविषयी नाही बोलत आहे मी बोलतोय कवितांविषयी.

या जगात काही गोष्टिंची बातच काही खास असते
अन म्हनूनच की काय.....
एवढे जलाशय असूनही चातकाला
हस्ताच्या पावसाची आस असते!

बरोबर ना?

आयुष्याच्या वळणावर अनेक माणसे आपल्याला भेटतात काही क्षण सोबत देतात व नकळतच निघुन जातात आयुष्य हे सर्वांगसुंदर बनवण्यासाठी काही तरी ध्येय समोर असायलाच हवे . आयुष्य किती आहे ह्याच्या पेक्षा आयुष्य कसे आहे हे महत्वाचे बरोबर ना?

दिवस सरतील तसा होईनही धुसर आणी अस्पष्ठ मी
तरीही राहीन सुप्तावस्थेत पुन्हा एखदा अंकूरण्यासाठी
लागतील काही जन्म
उलटतील काही जन्म
पण मी तर् तुझाच आहे
प्रत्येक जन्मासाठी!!!!!!!!!!!!!!!

No comments: